थंडीच्या दिवसांमध्ये घरी बनवा गूळ-शेंगदाण्याचा पराठा
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा कमी होत जाते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी आहारात गूळ, चणे, शेंगदाणे इत्यादी गरम पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराला फायदे होतील. थंड वातावरण असल्यामुळे अनेक घरांमध्ये लाडू, चिक्की इत्यादी पदार्थ बनवले जातात. शिवाय जेवण बनवतना गूळ आणि शेंगदाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण अनेकांना शेंगदाणे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही गूळ शेंगदाण्याचा पराठा बनवू शकता. गूळ शेंगदाण्याचा पराठा चवीला खूप सुंदर लागतो. सकाळच्या नाश्त्यात गूळ आणि शेंगदाण्याचा पराठा खाल्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया गूळ शेंगदाण्याचा पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा