जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा
रोजच्या जेवणात नेहमीच काय भाजी बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमीच भेंडी, तोंडली, गवार किंवा इतर भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर जेवणात झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झणझणीत चवीचा शेंगदाण्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं शेंगदाण्याचा ठेचा खायला खूप आवडतो. हा ठेचा तुम्ही भाकरी, भात, चपातीसोबत खाऊ शकता. शेंगदाण्याचा ठेचा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. तिखट किंवा कोणताही झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही शेंगदाण्याचा पारंपरिक पद्धतीने ठेचा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)