कडक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात बनवा थंडगार पुदिन्याचा रायता
उन्हाळा वाढल्यानंतर आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढत जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. नारळ पाणी, ताक, दही इत्यादी पेयांचे आवर्जून सेवन केले जाते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. पचनसंबंधित समस्या, डिहायड्रेशन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात दही, ताक आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात पुदिन्याचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला पुदिन्याचा रायता लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)