Prawns Roll Recipe : प्राॅन्स रोल हा फक्त चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतो. आपण मैद्याच्या पोळीपासून नाही तर उरलेल्या चपातीपासून हा रोल तयार करणार आहोत. डाएट रुटीवमध्ये तुम्ही ही रेसिपी समाविष्ट करु शकता.
प्राॅन्स रोल तयार करुन तुम्ही तुमच्या भुकेला शमवू शकता.
ही रेसिपी टेस्टीच नाही तर हेल्दीही आहे.
मासेप्रेमीनसाठी प्रॉन्स रोल हा चटपटीत आणि स्वादिष्ट पर्याय आहे. रसाळ प्रॉन्सला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि सुगंधी मसाल्यांची चव देऊन तयार केलेले हे सारण पोळी किंवा रॅपमध्ये गुंडाळले जाते. बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मसालेदार प्रॉन्स असलेला हा रोल नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा हलक्या जेवणासाठीही बनवता येतो. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी घरच्या घरी सहज करून पाहता येते आणि आपला वेळही वाचवते. चला याची रेसिपीनोट करून घेऊयात.
स्वच्छ केलेल्या प्रॉन्समध्ये हळद, थोडे मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. साधारण 10 ते 15 मिनिटे मुरू द्या.
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मऊ आणि हलका सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परता.
त्यात चिरलेला टोमॅटो, धणे-जिरे पूड, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. टोमॅटो मऊ होऊन मसाला तेल सोडेपर्यंत शिजवा.
आता मॅरिनेट केलेले प्रॉन्स कढईत घाला. मध्यम आचेवर प्रॉन्स पूर्णपणे शिजेपर्यंत परता. प्रॉन्स जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा ते कडक होऊ शकतात.
प्रॉन्स शिजल्यावर काळी मिरी पूड आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. शेवटी लिंबाचा रस टाकून मिश्रण एकदा ढवळा. सारण थोडे कोरडे असणे आवश्यक आहे.
चपाती तव्यावर हलकी गरम करा. त्यावर मेयोनीज किंवा हिरवी चटणी पसरवा. मधोमध तयार केलेले प्रॉन्सचे सारण ठेवा. त्यावर उभा चिरलेला कांदा आणि थोडा चाट मसाला घाला.
चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित दुमडून घट्ट रोल करा. तव्यावर थोडे बटर किंवा तेल लावून रोल हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम प्रॉन्स रोल चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
Web Title: How to make prawns roll at home tiffin recipe