
रोजच्या आहारात नियमित खा भोपळ्याच्या बियांची चटणी
आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेतात. सगळ्यांचं फिट आणि स्लिम राहायचे आहे. पण जीवनशैलीत कळत नकळत होणाऱ्या चुकांमुळे वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम केला जातो तर कधी डाएट, हेल्दी ड्रिंक, सप्लिमेंटन्स इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होऊन होत नाही. अशावेळी आहारात वेगवेगळ्या बियांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भोपळ्याच्या बियांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भोपळ्याच्या बिया शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत. यामध्ये प्रथिने, गुड फॅट्स, मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. भोपळ्याच्या बिया नियमित खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच हाडांचे आरोग्य सुद्धा निरोगी राहते. भोपळ्याच्या बिया तुम्ही नुसत्याच सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या बियांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल उत्साहाने! सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला
Recipe : हिवाळ्यातील पौष्टिक भाज्यांची मजा लुटा, घरी बनवा मसालेदार अन् चमचमीत ‘व्हेज कोल्हापुरी’