सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रव्याचा चिल्ला बनवू शकता. रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अनेक वेगवेगळे बनवले जातात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातो आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा लहान मुलं भाज्या आणि कांदा टोमॅटो खाण्यास नकार देतात. जेवणातील कांदा टोमॅटो बाहेर काढून फेकून दिला जातो. अशावेळी तुम्ही मुलांसाठी अनेक नवनवीन पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रव्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






