चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
Food Recipe: लहान मुलं कायमचं विकतचे पदार्थ खाण्याचा खूप जास्त हट्ट करताता. संध्याकाळच्या वेळी चहासोबत सगळ्यांच काहींकाही कुरकुरीत आणि खमंग खाण्याची इच्छा होते. अशावेळी चकली किंवा मैद्यापासून बनवलेल्या अनहेल्दी पॅक बंद स्नॅक्स विकत आणून खाल्ले जातात. हे चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. त्यामुळे मुलांना कायमच विकतचे पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले नाचणीचे चिप्स बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. बाजारातील तेलकट आणि हवाबंद खाऊ मुलांना खायला देण्याऐवजी घरी बनवलेले नाचणीचे मुलांच्या डब्यात किंवा भूक लागल्यानंतर खावेत. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह इत्यादी घटक असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात नियमित एक नाचणीची भाकरी खावी. चला तर जाणून घेऊया नाचणीचे चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स






