साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा
Sugar Free Ladoo: थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची फार आवश्यकता असते. कारण थंड वातावरणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे वर्षानुवर्षे आहारात डिंक लाडूचा समावेश केला जातो. डिंक, खसखस, सुका मेवा आणि खजुराचा वापर करून बनवलेले लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. ,मधुमेह किंवा शरीरसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण साखर किंवा गूळ खाणे टाळतात. त्यामुळे या लाडूमध्ये साखरेच्या ऐवजी खजुराचा वापर करावा. खजूर खाल्ल्यामुळे लाडूचा गोडवा वाढतो आणि चव सुद्धा मस्त लागते. थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तुपाचा वापर करून बनवलेले लाडू दोन महिने व्यवस्थित टिकून राहतात. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
health tips: हिवाळ्यामध्ये आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा?






