नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचे मिल्कशेक
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा उत्तरं वेळी सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना नेमकं काय खायला द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शिवाय आरोग्याला हानी पोहण्याची शक्यता असते. हिवाळा ऋतूंमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. साथीचे आजार वाढू लागले की सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांची लागण होते. अशावेळी मुलांना पौष्टीक आणि आरोग्यदायी नाश्ता देणे आवश्यक आहे. लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी मिल्कशेक प्यायला खूप आवडते दुधापासून बनवलेले पदार्थ लहान मुलं आवडीने खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणीचे मिल्कशेक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. नाचणी मिल्कशेक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय कमीत कमी साहित्यामध्ये मिल्कशेक तयार होते.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या फायबरमुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर मानले जाते. शिवाय यामध्ये कॅल्शियम आढळून येते, ज्याचा फायदा शरीरातील हाडांना होतो. त्यामुळे रोजच्या आहारात नाचणीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणी मिल्कशेक बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा