
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक नाचणीचे सूप
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणी खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नाचणीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीपासून भाकरी, स्मूदी इत्यादी पदार्थ बनवले जातात. अनेकदा सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणीचे पौष्टिक सूप बनवू शकता. नाचणीचे सूप कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा