
हिवाळ्यात नक्की करून पहा पारंपरिक राजस्थानी स्टाईल कच्च्या ओल्या हळदीची भाजी
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात. पालेभाजी, फळभाजी, कंदमूळ, यासोबतच कच्ची हळद सुद्धा मिळते. हळदीचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात कच्ची ओली हळद मोठ्या प्रमाणावर विकली जाते. हळदीमध्ये असलेले गुणधर्म आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासोबतच त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यास मदत करतात. ओल्या हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती सुधारते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या ओल्या हळदीचे सेवन केल्यास कायमच हेल्दी राहाल. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक राजस्थानी स्टाईलने हळदीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हळदीची भाजी खाऊन घरातील सगळेच तुमचे कौतुक करतील. राजस्थानी पद्धतीमध्ये दिलेल्या फोडणीमुळे भाजीची चव अप्रतिम लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)