
अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक
कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पाचे स्मरण आणि पूजा करून केले जाते. २०२६ मध्ये पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. यादिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय अनेक लोक उपवास सुद्धा करतात. बाप्पाच्या नैवेद्यात कायमच मोदक बनवले जातात. बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत. कायमच उकडीचे किंवा गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रव्याचे मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. पण बऱ्याचदा रव्याचे मोदक बनवताना उकड व्यवस्थित तयार होत नाही. ज्यामुळे मोदकांचा आकार पूर्णपणे बिघडून जातो. त्यामुळे या पद्धतीने मोदक केल्यास मोदकाची उकड व्यवस्थित तयार होईल आणि मोदक सुद्धा चवदार होतील. चला तर जाणून घेऊया रव्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी, नोट करून घ्या रेसिपी