सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी ब्रेड बटर किंवा बिस्कीट इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच ब्रेड खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायला सगळ्यांचं हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक ब्रेड पकोडा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना बनवून नेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करूनच कामासाठी बाहेर जावे. कारण उपाशी पोटी दीर्घकाळ राहिल्यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी पोटभर नाश्ता करावा, ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी