Chapati Making Tips
खूप प्रयत्न करूनही अनेकांना मऊ चपाती बनवता येत नाही. अनेकदा सुरूवातील चपाती मऊ राहाते पण नंतर वातड होते आणि मग संध्याकाळी अशी चपाती खाताना खूपच त्रास होतो आणि मनातील इच्छाही निघून जाते. अशा स्थितीत या चपाती चांगल्या दिसत नाहीत आणि खाल्ल्यावर चविष्टदेखील लागत नाहीत.
तुम्हाला जर चपाती मऊ राहायला हव्या असतील तर आम्ही या लेखातून काही सोप्या टिप्स देत आहोत. या युक्ती वापरल्यानंतर तुम्ही बनवलेल्या चपाती अनेक तासांनंतरही मऊ राहतील. चला तर मग जाणून घेऊया मऊ आणि गोल चपाती बनवण्याची पद्धत. (फोटो सौजन्य – iStock)
मऊ पीठ मळून घ्या
बरेच लोक पीठ खूप घट्ट मळून घेतात, त्यामुळे चपाती कडक, वातड अथवा संध्याकाळपर्यंत चिवट होतात. अशा परिस्थितीत, मऊ चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठदेखील मऊ मळून घेणे आवश्यक आहे. यासाठी पिठातील पाण्याचे प्रमाणही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वाटल्यास कणीक मळताना पिठात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेलही मिक्स करू शकता.
[read_also content=”बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? सोपी पद्धत https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-knead-dough-with-ice-cubes-can-make-soft-chapati-recipe-536724/”]
पुरेसे पाणी मिसळा
कणीक मळताना, पाण्याचे प्रमाणदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तविक, गव्हाचे पीठ पाणी शोषून घेते, अशा परिस्थितीत जेव्हा चपाती गरम तव्यावर ठेवली जाते तेव्हा वाफ तयार होते, ज्यामुळे रोटी चांगली फुगते. त्यामुळे पिठात पुरेसे पाणी घाला. यासोबतच कणीक गुळगुळीत मळून घ्या आणि थोडा वेळ ही कणीक तिंबू द्या. तिंबलेल्या कणकेच्या चपाती अधिक मऊ होतात.
[read_also content=”सफेद चपाती बनविण्यासाठी सोप्या टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/learn-how-to-make-chapatis-white-in-color-a-simple-trick-that-is-made-for-daily-meals-nrsk-533945/”]
अशा प्रकारे लाटा चपाती
अशा प्रकारे भाजा चपाती
तूप किंवा तेल लावा
जर तुम्हाला तूप किंवा तेल खायला आवडत असेल तर चपाती बनवल्यानंतर तूप किंवा तेल त्यावर लावा. त्यामुळे चपाती जास्त काळ मऊ राहतात आणि कडक होत नाहीत. तसंच अधिक चविष्ट लागतात. गरमागरम आणि मऊसूत चपाती बनवणे तुमच्यासाठीही सोपे होईल जर तुम्ही या वर दिलेल्या टिप्स वापरल्या. मग वाट कसली पाहताय? चला पटापट ही पद्धत वापरा आणि करा मऊ, लुसलुशीत आणि फुगलेल्या चपाती.