
कायमच जंक फूडचे खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा सोयाबीन टिक्की
सकाळच्या नाश्त्यात अनेकांना बाहेरील विकतचे पदार्थ खाण्याची सवय असते. नाश्त्यात कायमच कांदाभजी, वडापाव, सामोसा, मेदुवडा इत्यादी तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्लेले जातात. पण नेहमीच बाहेरील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सोयाबीन टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सोयाबीन खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. जिमवरून आल्यानंतर किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही लगेच सोयाबीनपासून टिक्की बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेला पौष्टिक पदार्थ शरीरासाठी अतिशय फायदे आहे. चला तर जाणून घेऊया सोयाबीन टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी