Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची ‘कोळंबी करी’ घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या

Praws Curry Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास आजच्या मेजवानीत आम्ही तुमच्यासाठी सर्व्ह करत आहोत कोळंबी करीची एक स्वादिष्ट रेसिपी. पारंपरिक चवीने नटलेली ही डिश रविवारच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 05, 2025 | 03:31 PM
सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची 'कोळंबी करी' घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या

सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची 'कोळंबी करी' घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

रविवारचा दिवस म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी त्यांच्या आवडीचा दिवस. या दिवशी बहुतेक लोकांच्या घरी मांसाहारी जेवणाचा बेत आखला जातो. अशात तुम्हीही जर सीफूड लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत कोळंबी करीची एक चविष्ट आणि मसालेदार अशी रेसिपी जिचा सुगंधच तुमच्या घरात सर्वांच्या तोंडाला पाणी आणेल.

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

कोळंबीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं, कारण तिचा मऊसूत टेक्सचर आणि मसाल्यांमध्ये शिजल्यावर येणारा सुगंध मन मोहवतो. नारळाचं दूध, कोथिंबीर, आणि कोकणच्या खास मसाल्यांसोबत तयार केलेली कोळंबी करी ही भाताबरोबर किंवा भाकरीसोबत खाल्ल्यावर अगदी स्वर्गीय चव देते. पारंपरिक कोकणी पद्धतीने बनवलेली ही करी केवळ स्वादिष्टच नाही तर प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सने भरलेली असल्यामुळे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया पारंपरिक आणि घरगुती स्टाइलमध्ये झणझणीत कोळंबी करी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.

साहित्य:

  • स्वच्छ धुतलेल्या कोळंब्या – २५० ग्रॅम
  • कांदा – २ (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – १ (चिरलेला)
  • आले-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • ओले खोबरे – ½ कप
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • धने पावडर – १ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • चिंचेचा कोळ – १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – २ टेबलस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम कोळंबी नीट धुऊन तिची साल आणि आतला काळपट धागा काढून टाका. थोडं मीठ आणि हळद लावून १० मिनिटं मॅरिनेट करा.
  • मिक्सरमध्ये ओलं खोबरे, कांद्याचा अर्धा भाग, थोडं लाल तिखट आणि थोडं पाणी घालून एकसारखा गुळगुळीत मसाला वाटून घ्या.
  • कढईत तेल गरम करून उरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या.
  • टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला घालून परता.
  • आता वाटलेला खोबऱ्याचा मसाला कढईत टाका आणि दोन मिनिटं चांगला परता, जेणेकरून मसाल्याचा सुगंध येईल.
  • मसाला चांगला तेल सोडू लागला की त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी घालून हलक्या हाताने मिसळा. थोडं पाणी घालून ८-१० मिनिटं झाकून शिजवा.
  • कोळंबी शिजल्यावर त्यात कोथिंबीर घाला आणि शेवटी थोडा चिंचेचा कोळ घातल्यास आंबटपणा येईल. गरम भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
  • नारळाचं दूध घातल्यास करी आणखी रिच आणि क्रीमी लागते.
  • हवं असल्यास हिरवं तिखट आणि कोथिंबीर वाटून हिरवा मसालाही वापरू शकता.

Web Title: How to make spicy and authentic prawns curry at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
1

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
4

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.