Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

Bread Cutlet Recipe : मसालेदार स्टफिंगने भरलेले कुरकुरीत ब्रेड कटलेट सकाळच्या किंवा संध्यकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट ठरतात. तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच मार्केट स्टाईल ब्रेड कटलेट तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 03:30 PM
Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल 'ब्रेड कटलेट'

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल 'ब्रेड कटलेट'

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रेड कटलेट हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
  • बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार स्टफिंगने भरलेले हे कटलेट चवीला फार छान लागतात.
  • तुम्ही घरीच मार्केट स्टाईल टेस्टी ब्रेड कटलेट तयार करू शकता.
पावसाळ्याची संध्याकाळ असो, मुलांच्या डब्यासाठी काहीतरी खास करायचं असो किंवा अचानक घरी पाहुणे आले असतील, तर पटकन तयार होणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे ब्रेड कटलेट. घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या ब्रेड आणि उकडलेल्या बटाट्यापासून बनणारा हा पदार्थ चविष्ट, किफायतशीर आणि झटपट होणारा आहे.

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

ब्रेड कटलेटची खासियत म्हणजे त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या, मसाले आणि हिरवी चटणी घालून वेगवेगळे फ्लेवर्स तयार करू शकतो. बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत तर आतून मऊसर असलेले हे कटलेट चहा किंवा कॉफीसोबत अप्रतिम लागतात. मुलांना भाज्या खायला आवडत नसतील तर त्या कटलेटमध्ये मिसळून दिल्यास तेही आनंदाने खातात. चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने ब्रेड कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 6 ब्रेडच्या स्लाईस
  • 2 मध्यम उकडलेले बटाटे (कुस्करलेले)
  • 1/4 कप बारीक चिरलेली गाजर
  • 1/4 कप बारीिक चिरलेले मटार
  • 1 लहान कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • 1/2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • तळण्यासाठी तेल
  • पाणी
मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून टाका आणि ब्रेड थोड्या पाण्यात हलकासा भिजवून लगेच पिळून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे, गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
  • आता पिळलेला ब्रेड या मिश्रणात घालून पुन्हा एकजीव करा.
  • तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना कटलेटचा आकार द्या.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे कटलेट सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम ब्रेड कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • कटलेट अधिक कुरकुरीत हवे असतील तर तळण्यापूर्वी रव्यामध्ये किंवा ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
  • हेल्दी पर्यायासाठी हे कटलेट शॅलो फ्राय किंवा एअर फ्रायरमध्येही बनवू शकता.
  • चीज घालून बनवल्यास मुलांना आणखी आवडतील.
  • चविष्ट आणि झटपट होणारी ही ब्रेड कटलेट रेसिपी नक्की करून पाहा!

Web Title: Make tasty and crispy bread cutlet at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail
1

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश
2

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय
3

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश
4

हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.