हरतालिकेच्या उपवासाला झटपट बनवा साबुदाण्याची तिखट लापशी
संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधल्या दिवशी हरतालिका पूजा केली जाते. यादिवशी निर्जळी उपवास केला जातो. उपवासामध्ये ठरविक पदार्थांचे सेवन केले जाते. उपवकासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणे खाल्ले जातात. आपल्यातील अनेकांना साबुदाणे खायला खूप जास्त आवडतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. साबुदाण्यांपासून खिचडी, वडा किंवा साबुदाण्याची खीर बनवली जाते. मात्र कायमच ठराविक तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याची तिखट लापशी बनवून खाऊ शकता. हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या वाढू लागते. चला तर जाणून घेऊया साबुदाण्याची लापशी बनवण्याची सोपी रेसिपि.(फोटो सौजन्य – istock)
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी