नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये पोहे, उपमा, शिरा, इडली इत्यादी पदार्थ बनवले पदार्थ जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पालकपासून थालीपीठ बनवू शकता. लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. पण पालकमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. पालक खाल्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते. पालक खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात तुम्ही पालकचे सेवन करू शकता.चला तर जाणून घेऊया पालक थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: गूळ की मध? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? जाणून घ्या