वाढत्या वजनाने बहुतेक जण त्रासली आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक गोष्टींचा अवलंब करत आहेत. आहारातील निवड अत्यंत महत्वाची असते. आपण आपल्या सेवनामध्ये काय खातो? याचा मुख्य परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. वजन कमी करताना साखरे टाळणे महत्वाचे असते. अशा वेळी साखरेला पर्याय म्हणून लोकं मध किंवा गुळाचा पर्याय निवडतात. काही जण तर या दोन्ही पर्यायांमध्ये गोंधळून जातात. पाहायला गेले तर, गूळ आणि मध दोन्ही पर्याय नैसर्गिक आहेत, मात्र वजन घटवण्याच्या दृष्टीने त्यांचा वापर कसा करावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : दिवाळीच्या खरेदीसाठी दिल्लीतील ‘या’ बाजारपेठा आहेत सर्वोत्तम; सर्व वस्तू बजेटमध्ये होतील उपलब्ध
गूळ हा साखरेचा पर्याय जरी असला तरी त्यात बऱयापैकी साखर असते. त्यामुळे, गुळाचे जास्त सेवन वजन कमी करण्यास काही लाभदायक नाही. गूळ हा नैसर्गिक पदार्थ आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात. याच्या सेवनामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, त्यामुळे पचनशक्तीही उत्तम राहते. थंडीमध्ये गुळाचे सेवन फायद्याचे असते. गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधरवण्याच्या क्रियेत मदत करते. परंतु, याच्या सेवनावर मर्यादा असणे गरजेचे आहे.
मधामध्ये कमी कॅलरी आढळून येतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने शरीराला आवश्यक पोषण मिळतेच, तसेच मधाचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, कारण ते चयापचय क्रिया वाढवते. मधामध्ये अनेक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. गरम पाण्यामध्ये मध मिसळून घेतल्यास आणि त्याचे सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते.
हे देखील वाचा : कथाकार व.पु. काळे यांचे ‘हे’ साहित्य नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी मध गुळापेक्षा अधिक उपयुक्त मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे मधामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे आणि ते शरीरात अधिक प्रभावीपणे प्रक्रिया होते. मात्र, या दोन्ही पदार्थांचे प्रमाणीत सेवन आवश्यक आहे. अति प्रमाणात गोड पदार्थ घेतल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. शेवटी, वजन कमी करण्यासाठी आहाराबरोबरच नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली हे देखील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे मध असो किंवा गूळ, या पदार्थांचे प्रमाणीत आणि योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते.