आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात प्रामुख्याने दिसणारी लाल रंगाचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. चवीला आंबट गोड असलेल्या स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. या फळामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात आढळून येते. याआधी तुम्ही स्ट्रॉबेरीपासून बनवलेला जॅम, ज्युस किंवा सॅलड खाल्ले असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरीची चटकदार चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्ट्रॉबेरीची चटणी तुम्ही चपाती, नाचोज, चिप्स इत्यादी पदार्थांसोबत डीप म्हणून सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)