संकष्टी चतुर्थीला सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट रताळ्याचा किस
गणपती बाप्पावर सगळ्यांची श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. उपवास करून बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणे, भगर, बटाटा इत्यादी ठराविक उपवासाच्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण कायमच तेच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रताळ्याचा किस बनवण्याची सोपी सांगणार आहोत. उपवासाच्या दिवशी आहारात रताळ्याचे सेवन करावे. कारण रताळ हे कंदमूळ आहे. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे शरीराची पचनक्रिया अजिबात बिघडत नाही. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटलं आढळून येतात. यामध्ये असलेल्या एंटीऑक्सिडेंट्समुळे आरोग्यासह शरीराला अनेक फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात रताळी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी. उपवासाच्या दिवशी कोणतेही तेलकट किंवा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी कायमच हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू, बालपणाची होईल आठवण