शाळेच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चविष्ट कांदा- कोथिंबीर पराठा
शाळेच्या डब्यात सर्वच लहान मुलांना काहींना काही चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच चपाती भाजी खाऊन लहान मुलांना कंटाळा येतो.त्यामुळे मुलांना जेवणाच्या डब्यात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घाईगडबडीच्या वेळी शाळेच्या डब्यासाठी कांदा कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. याशिवाय मुलांना कायमच नाश्त्यात तिखट, तेलकट पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास द्यावेत. लहान मुलांना कांदा खायला आवडत नाही. कांद्याचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पण तिखट चवीचा कांदा शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतो. चला तर जाणून घेऊया कांदा कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)