सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवास भाजणीचे थालीपीठ
श्रावण महिन्यात महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. उपवास केल्यानंतर संपूर्ण दिवस काहीच खाल्ले जात नाही. साबुदाणा खाल्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या वाढू लागते. त्यामुळे उपाशी पोटी साबुदाणे अजिबात खाऊ नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवास भाजणीचं वापर करून खमंग थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थालीपीठ बनवण्यासाठी वेगवेगळ्या डाळींच्या पिठाचा वापर केला जातो. मात्र उपवासाची भाजणी तयार करताना राजगिरा, वरी इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया उपवास भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
रविवार होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
Raksha Bandhan 2025 : सणानिमित्त घरी बनवा राजस्थानची फेमस मिठाई ‘घेवर’, फार सोपी आहे रेसिपी