Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

गावाकडच्या चुलीपासून ते शहरी स्वयंपाकघरापर्यंत आजही लिट्टी चोख्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यात गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या लिट्टीला तुपात बुडवून मग वांग्याच्या चोख्यासोबत सर्व्ह केले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 27, 2025 | 09:30 AM
Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

Follow Us
Close
Follow Us:
  • लिट्टी-चोखा हा उत्तर प्रदेशातील पारंपरिक पदार्थ आहे
  • शहरी भागात हा फार कमी जागी विकत मिळतो
  • तुम्ही घरीच या पदार्थाला तयार करू शकता
लिट्टी-चोखा ही बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय डिश आहे. जुन्या काळी प्रवासी, शेतकरी आणि कामगारांसाठी ही डिश ऊर्जा देणारी व सोपी ने-आण करण्यासाठी उपयुक्त मानली जात असे. काळाच्या ओघात या पदार्थाची लोकप्रियता केवळ बिहारपुरती मर्यादित राहिली नाही, तर भारतभर त्याचा सुगंध आणि चव पसरली. गव्हाच्या पीठापासून तयार केलेली लिट्टी आणि भाजलेल्या वांग्याचा, टोमॅटोचा तसेच बटाट्याचा चविष्ठ चोखा हे दोन्ही घटक एकत्र येऊन एक अनोखा अनुभव देतात. आज आपण याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

लिट्टीला तुपात बुडवून खाण्याची पद्धत पारंपरिक आहे. यामुळे त्याची चव अधिक खुलते आणि प्रत्येक घासाला साजूक तुपाचा सुगंध मिळतो. यामध्ये वापरलेला सत्तू हा प्रथिनयुक्त असल्याने ही डिश पौष्टिकही आहे. चोख्यातील लसूण, मोहरीचे तेल आणि कोथिंबीर एकत्र येऊन देणारा खमंगपणा तर वेगळाच आहे. लिट्टी-चोखा हा फक्त एक पदार्थ नसून लोकजीवनात रुजलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे, जी गावाकडच्या चुलीपासून ते शहरी स्वयंपाकघरापर्यंत सर्वत्र आवडीने बनवली जाते.

साहित्य

  • गव्हाचे पीठ – 2 कप
  • मीठ – चवीनुसार
  • तूप – 2 टेबलस्पून
  • पाणी – मळण्यासाठी
  • सत्तू – 1 कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 2 बारीक चिरून
  • कांदा – 1 बारीक चिरून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – चिमूटभर
  • मोहरीचे तेल – 1 टेबलस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून
चोख्यासाठी साहित्य
  • वांगे – 1 मोठे
  • बटाटे – 2 उकडलेले
  • टोमॅटो – 2 भाजलेले
  • कांदा – 1 बारीक चिरून
  • लसूण – 4 पाकळ्या (भाजलेल्या)
  • हिरवी मिरची – 2
  • मीठ – चवीनुसार
  • मोहरीचे तेल – 1 ते 2 टीस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय, नोट करा रेसिपी

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पीठात मीठ आणि तूप घालून नीट मिसळा. नंतर पाणी टाकून नरमसर पीठ मळून 10 मिनिटे झाकून ठेवा.
  • एका भांड्यात सत्तू, मीठ, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कांदा, अजवाइन, लिंबाचा रस, मोहरीचे तेल आणि कोथिंबीर घालून छान मिसळा.
  • पीठाचे छोटे गोळे करा आणि त्यामध्ये सत्तूची सारण भरून लिट्टीचे आकार बनवा.
  • तंदूर, ओव्हन किंवा गॅसवरील जाळीवर लिट्टी दोन्ही बाजूंनी भाजा. ती छान फुगली आणि ब्राउन रंगाची झाली की तयार.
  • भाजलेली लिट्टी गरम असतानाच साजूक तुपात बुडवा.
  • वांगे आणि टोमॅटो थेट गॅसवर भाजून घ्या. वांग्याची साल काढा.
  • एका भांड्यात उकडलेले बटाटे, भाजलेले वांगे, टोमॅटो आणि लसूण एकत्र मॅश करा.
  • त्यात कांदा, हिरवी मिरची, मीठ आणि मोहरीचे तेल घालून नीट एकत्र करा.
  • शेवटी चिरलेली कोथिंबीर घातली की चोखा तयार.
  • गरमागरम लिट्टी तुपात बुडवून बाहेर काढा आणि चोख्यासोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make uttar pradesh famous litti chokha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी
1

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर
2

Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते
3

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका मंदिराचे बांधकाम झाले पूर्ण; समाजवादी नेते अखिलेश यादवांनी केली घोषणा
4

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका मंदिराचे बांधकाम झाले पूर्ण; समाजवादी नेते अखिलेश यादवांनी केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.