Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरिक अ‍ॅसिड बोटांमध्ये जमा करते दगड; डॉक्तरांनी सांगितले ४ प्रभावी उपाय ज्याने क्षणातच सर्व कचरा पडेल बाहेर

युरिक अ‍ॅसिडची समस्या झपाट्याने वाढत आहे. याचे सेवन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते. अशात काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2025 | 08:18 PM
युरिक अ‍ॅसिड बोटांमध्ये जमा करते दगड; डॉक्तरांनी सांगितले ४ प्रभावी उपाय ज्याने क्षणातच सर्व कचरा पडेल बाहेर

युरिक अ‍ॅसिड बोटांमध्ये जमा करते दगड; डॉक्तरांनी सांगितले ४ प्रभावी उपाय ज्याने क्षणातच सर्व कचरा पडेल बाहेर

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल अनेकांना युरिक अ‍ॅसिडची समस्या जाणवत आहे. युरिक ऍसिड हे एक नैसर्गिकरित्या तयार होणारे रसायन आहे, जे आपल्या शरीरातील पेशींच्या विघटन प्रक्रियेतून तयार होते. प्युरीन नावाचे घटक असलेल्या पदार्थांच्या सेवनाने युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते सांध्यांमध्ये किंवा किडनीच्या जमा होऊन समस्या निर्माण करू शकते. जर तुम्हाला सांध्यामध्ये, विशेषतः पायाच्या बोटात अचानक तीव्र वेदना, सूज येणे, लालसरपणा, किडनी स्टोन, बोटांमध्ये सूज येणे, बोटे वाकवताना वेदना होणे अशी लक्षणे जाणवत असतील, तर हे सांध्यामध्ये युरिक अ‍ॅसिड वाढल्याचे लक्षण असू शकते. यामुळे किडनी स्टोन, गाउट किंवा आरोग्याच्या इतर समस्या होण्याचा धोका असतो. अशात वेळीच याच्यावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड कमी करू शकता.

केसगळतीची समस्या होईल मुळापासून दूर; फक्त स्वयंपाकघरातील या 3 पदार्थांची मदत घ्या; टक्कल झालेल्या जागीही उगवतील नवे केस

काकडी

काकडी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करू शकते. काकडी शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते, ही पचायला हलकी असते. काकडीचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास मदत करते. काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, ज्यामुळे ते किडनी स्वच्छ करण्यास आणि मूत्रमार्गे युरिक अ‍ॅसिड बाहेर टाकण्याचे काम करते. काकडीत प्युरिनचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते युरिक अ‍ॅसिड वाढवणारे अन्न नाही.

बार्ली

आयुर्वेदात बार्लीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असे म्हटले जाते आणि ते युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते असे देखील मानले जाते. जर तुम्हाला गाउटची समस्या जाणवत असेल अथवा शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असेल किंवा सांधेदुखी असेल तर बार्लीचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्ही यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता. बार्ली शरीरातील अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड आणि विषारी पदार्थ मूत्रमार्गे बाहेर काढण्यास मदत करते. नैसर्गिक शुद्धीकरणासाठी बार्लीचे पाणी पिऊ शकता.

व्हिटॅमिन सी असलेली फळं

व्हिटॅमिन सी हे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे शरीरातील अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळा. संत्री, लिंबू, पेरू या फळांचे सेवन करू शकता. यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळे तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू देणार नाहीत ज्यामुळे निश्चितच याचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ही फळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.

पाणी

तुमच्याही शरीरात जर युरिक अ‍ॅसिडची पातळी झपाट्याने वाढत असेल तर यावर पाण्याचे सेवन सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पुरेसे पाणी पिऊन तुम्ही तुमच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करू शकता. पाण्याचे सेवन किडनीला सक्रिय करतात ज्यामुळे शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. यासाठी दररोज किमान २.५-३ लिटर पाण्याचे सेवन करायला हवे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिंबू पाणी करून देखील पिऊ शकता.

काळाकुट्ट तवा अवघ्या २० रुपयांतच काचेसारखा चकाकेल; १० मिनिटांचा उपाय अन् कोणत्या मेहनतीचीही गरज नाही

FAQs (संबंधित प्रश्न)

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?
युरिक आम्ल हे शरीरातील प्युरिनच्या विघटनामुळे निर्माण होणारे नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे.

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची लक्षणे कोणती?
अचानक, तीव्र सांधेदुखी, सूज आणि लालसरपणा, बहुतेकदा मोठ्या पायाच्या बोटात (गाउट). मूतखडे, ज्यामुळे पाठीत किंवा बाजूला तीव्र वेदना, लघवी करताना वेदना किंवा लघवीमध्ये रक्त येऊ शकते

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to naturally remove uric acid from body health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips
  • uric acid

संबंधित बातम्या

श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला
1

श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या
2

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या

आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय
3

आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश
4

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.