(फोटो सौजन्य: Instagram)
स्वयंपाकघरात अनेक लहान मोठ्या समस्या दररोज जन्माला येत असतात ज्यांना तुम्ही काही घरगुती ट्रिक्सने सहज दूर करू शकता. प्रत्येक समस्येवर तोडगा असतो आणि तुम्हाला जर या घरगुती ट्रिक्स माहिती नसतील तर हा लेख तुमच्या कामाचा आहे. आपल्या घरात दररोज वापरला जाणारा तवा वारंवार वापरल्यामुळे काळा पडू लागतो. तुम्ही जर लक्ष दिले असेल तर तुम्हाला जाणवेल की, जेव्हा आपण एखादा नवीन तवा खरेदी करतो तेव्हा तो एकदम काचेसारखा चकाचकात असतो पण काही महिन्यातच याचे रूपांतर अवस्था काळ्या कुळकुळीत तव्यात बदलते. हळूहळू तव्यावर घाण काळा थर साचू लागतो आणि एकदा का थर साचला की मग त्याला दूर करणे कठीण होऊन बसते.
फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर
अनेकदा महागडे डिश लिक्विड देखील यावर परिणाम करत नाहीत आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक साधा, सोपा आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील काळा तवा कोणत्याही मेहनतीशिवाय सहज स्वछ करू शकता. आता घाण तवा स्वछ करण्यासाठी तुम्हाला तासनतास मेहनत घेण्याची गरज नाही कारण या उपायाने अवघ्या काही मिनिटांतच तुमचा तवा नव्यासारखा चकाकून निघेल. तव्याला स्वछ करण्याची ही ट्रिक @homecheff_renu या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओत पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप तवा साफ करण्याची ट्रिक समजून घेऊ शकता.
तवा साफ करण्यासाठी लागणारे साहित्य
योग्य पद्धत
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यासाठी सर्वप्रथम तुमचा काळा तवा घ्या आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्या. तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम कमी करा आणि त्यात पाणी, डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस पिळून टाका. सर्व साहित्य तव्यावर पसरवा आणि काहीवेळ हे पाणी असाच उकळू द्या. यांनतर काही मिनिटांनी लिंबाच्या सालीने तवा चांगला घासून काढा. तुम्ही पाहाल की, जसजसे तुम्ही लिंबाच्या सालीने तव्यावर घासत आहात तसतसा यावरील चिवट काळा थर सहज वेगळा होत आहे आणि मग काय गॅस बंद करून तव्यावरील हा सर्व थर घासून काढा. शेवटी तव्याला सामान्यपणे डिश लिक्विड आणि स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा आणि तुमचा चकचकीत तवा पुन्हा स्वयंपाकघरात सजवून ठेवा. ही घरगुती ट्रिक फार सोपी असून या ट्रिकची खासियत म्हणजे यात तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे घालवायचे नाहीत ना तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा आहे.
नॉन-स्टिक तवा कसा स्वच्छ करू शकतो?
स्वच्छ करण्यापूर्वी तवा थंड होऊ द्या, मऊ स्पंज किंवा कापड आणि सौम्य डिश साबण वापरा, तवा जास्त काळ भिजवू नका, कारण ते कोटिंग कमकुवत करू शकते.
तव्यावर अन्न जळाले तर काय करायचं?
मीठ आणि पाणी किंवा बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट वापरून त्या भागाला हळूवारपणे घासून घ्या. तवा गरम करून यात सर्व साहित्य गरम केल्याने जळलेले अवशेष सोडण्यास मदत होते.