फोटो सौजन्य: iStock
सध्या महागाईच्या काळात सोन्याचे दागिने खिशाला परवडत नाहीत. सोन्या चांदीचे भावात खूप वाढ झाली आहे. तसेच चोरीच्या अनेक घटनाही घडत आहेत. त्यामुळे कोणत्याही सण समारंभाला महिला शक्यतो आर्टीफिशियल ज्वेलरी घालतात. नेकलेस, झुमके, बांगड्या, अंगठ्या असे अनेक प्रकारचे दागिने आपण पाहतो आणि वापरतो. आर्टिफिशियल ज्वेलरी कॅरी करायला सोपी आणि रेडी टू वेअर असते.
सध्या महिला कार्यक्रमांसाठी या दागिन्यांची आनंदाने खरेदी करतात. पण हे दागिने रोज घालता येत नाहीत. म्हणून आपण कपाटात ठेवतो. मात्र दागिने वापरात आले नाही तर ते दागिने काळे पडल्याचे दिसून येते. मग आता काय करायचं? हा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात निर्माण होतो. तर आज आम्ही तुम्हाला दागिने काळे पडू नयेत यासाठी काय करावे याच्या ट्रिक्स सांगणार आहोत. याच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच दागिने स्वच्छ होतील.
चला जाणून घेऊयात आर्टिफिशियल दागिने स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स
बेकिंग सोडा आणि पाणी
प्रत्येकाच्या घरात बेकिंग सोडा उपलब्ध असतो. अर्धा कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या दागिन्यांवर लावा आणि मऊ टूथब्रशने हलक्या हाताने स्क्रब करुन घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
व्हिनेगर आणि मीठ
आर्टिफिशियल दागिने स्वच्छ करण्यासाठी, एक भांड्यात गरम पाणी , एक चमचा व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ मिसळा. नंतर या मिश्रणात तुमचे दागिने काही वेळ भिजत ठेवा. यामुळे दागिन्यांवर जमा झालेली घाण आणि काळपटपणा दूर होईल. 15 मिनिटांनंतर दागिने बाहेर काढून ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून घ्या.
लिंबाचा रस
दागिने साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. यासाठी एका वाटीत लिबांचा रस घेऊन तो दागिन्यांना लावा. 5 ते 10 मिनिटे दागिने तसेच ठेवा. काही वेळाने, मऊ कापडाच्या साहाय्याने दागिने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. मग, ते स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करुन घ्या. आता ते दागिने नवीन असल्यासारखे दिसतील.
टूथपेस्ट
यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर देखील करू शकता.दागिन्यांवर थोडी टूथपेस्ट लावून ब्रशच्या मदतीने नीट घासून घ्या. यानंतर, दागिने स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. तुम्हाला तुमचे दागिने एकदम नवीन वाटतील.