महाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या युतीकडून भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रविवार, १६ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवक पदांचे उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणुकीत दाखल करण्यात आले. मिरवणुकीची सुरुवात ग्रामदेवता श्री जाकमाता देवी मंदिरातून झाली. मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन केल्यानंतर उमेदवारांनी नगरपरिषद कार्यालयात तहसीलदार व निवडणूक अधिकारी महेश शितोळे यांच्याकडे अर्ज सादर केले.