Vaginal Infection कसे टाळावे (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता आणि ओलसरपणा योनीमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरते. या दिवसांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी कसे राहायचे याबाबत काही टिप्स या लेखाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. महिलांनो, या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करुन पावसाळ्यात निरोगी राहण्याची खात्री करा.
पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो. परंतु त्यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढतो. विशेषतः महिलावर्गास याचा धोका अधिक असतो. हे सर्वज्ञात आहे की या ऋतूत वाढलेली आर्द्रता, वातावरणातील बदल आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे योनीमार्गाच्या संक्रमणाची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे ओले अंतर्वस्त्रे, घट्ट कपडे घालणे आणि ओल्या कपड्यांमध्ये बराच वेळ वावरणे यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीचे वाढ होऊन संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात असलेल्या मर्यादित सूर्यप्रकाशामुळेही संसर्गाचा धोका वाढतो. डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी याबाबात अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
योनीमार्गाच्या संसर्गाचे प्रकार
Menstrual Hygiene: मासिक पाळीदरम्यान किती वेळा महिलांनी करावी आंघोळ? तज्ज्ञांचं उत्तर
या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
वेळीच उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत
जर वेळीच उपचार केले नाहीत तर, योनीमार्गाच्या संसर्गामुळे ओटीपोटात वेदना होऊ शकतात, मूत्रमार्गात संसर्ग पसरू शकतो, वारंवार संसर्ग होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. गर्भवती महिलांना प्रगत संसर्ग झाल्यास मुदतपूर्व प्रसूतीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय
महिलांनो, पावसाळ्यात संसर्गमुक्त राहण्यास या महत्त्वाच्या टिप्सचा वापर करा. जर तुम्हाला काही असामान्य लक्षणे आढळून आली तर वेळीच निदान आणि व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या पावसाळ्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास विसरू नका
Vaginitis म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध ठरू शकतात व्हजायनल इरिटेशनचे कारण, वाचा सविस्तर
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.