केमिकलयुक्त ब्लिच कायमचे जा विसरून! १० रुपयांच्या 'या' पदार्थाचा वापर करून बनवा आयुर्वेदिक ब्लिच
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर हवी असते. चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिन्यातून एकदा ब्लिच किंवा फेशियल यांसारख्या वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. तर कधी महागड्या स्किन ब्राइटनिंग ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. त्वचेचे सौंदर्य कायमच उठावदार आणि चमकदार करण्यासाठी ब्युटी क्रीम किंवा लोशनचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. ऊन, धूळ, माती किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात डेड स्किन जमा होऊन त्वचा खूप जास्त टॅन होते. चेहऱ्यावर वाढलेला काळपटपणा त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतो. काळवंडलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार आणि गोरीपान करण्यासाठी महागडे केमिकलयुक्त ब्लिच करून घेतले जाते. पण वारंवार ब्लिच केल्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होते. चेहऱ्यावर लालसरपणा वाढू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा डेड स्किन कमी करण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट, ब्लिच किंवा क्लीनअप, फेशिअल करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय केल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल. महागड्या ब्लीचमुळे काहीकाळ त्वचा अतिशय देखणी आणि गोरीपान दिसते. पण कालांतराने त्वचेसंबंधित गंभीर समस्या वाढू लागतात.
स्वयंपाक घरात अनेक नैसर्गिक पदार्थ उपलब्ध असतात. त्यातील लिंबू, बटाटा, दही आणि टोमॅटो यांसारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे तुम्ही या पदार्थांचा वापर करून घरीच ब्लिच करू शकता. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, डेड स्किन निघून जाईल. कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करेल. घरगुती पदार्थांपासून तयार केलेले ब्लिच त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते. केमिकलयुक्त महागड्या प्रॉडक्टवर कायमच खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.
दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल
ब्लिच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, लिंबाचा रस, मध आणि दही घालून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्यात गुलाब पाण्याचे दोन किंवा तीन थेंब टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा आणि कॉटनच्या कपड्याने सर्व त्वचा स्वच्छ करा. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल. त्वचा स्वच्छ करून झाल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.






