सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात!
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम?
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय?
सोशल मिडियाचा अतिवापर केल्यास होणारे परिणाम?
आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आणि धकाधकीच्या जीवनशैलीचे बनले आहे. शहरात राहण्याचा ताण, लहान कुटुंबपद्धती, वाढते ईएमआयचे हप्ते, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता यामुळे प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली जगत आहे. जीवन जगणेच जणू एक स्पर्धा बनली असून प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार या ताणाला सामोरे जात आहे. अनेक जण ताणतणावावर मात करतात, मात्र काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांच्या क्षमतेपेक्षा आरत्या वाणसामध्थाला की होतमानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे मानसोपचार विभागप्रमुख डॉ. निशिकांत थोरात यांनी नोंदवले आहेत.(फोटो सौजन्य – istock)
ताणतणावामुळे डिप्रेशन, अॅन्झायटी, स्ट्रेस यांसारखे मानसिक आजार वाढत असून त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होत आहे. मधुमेह, उच्च्च रक्तदाब यांसारखे आजार तसेच टोकाच्या परिस्थितीत आत्महत्येसारखे प्रकार घडताना दिसत आहेत. कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधातील ताण यांचाही यामध्ये मोठा वाटा आहे.
गेल्या वर्षभरात समाजात, विशेषतः तरुणांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही अशा घटना घडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयातील मनोविकारशास्त्र विभागाच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या तरुणांमध्ये अल्कोहोल, गांजा, अफू यांसारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात आढळून येते. महाविद्यालयीन विद्याथ्यर्थ्यांमध्ये तंबाखू, सिगारेट तसेच उत्तेजक द्रव्यांचे सेवन वाढले आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये गांज्याचे व्यसन सर्वाधिक असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले तरुण वयात मद्यपान आणि महागड्या अमली पदार्थांचे सेवन वाढत असून यामुळे कुटुंब आणि समाजाचे मोठे नुकसान होत आहे. एमडीसारखी औषधे महाग असून ती मिळवण्यासाठी तरुण घरातून पैसे मागतात किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या मोबाईल अॅप्सद्वारे कर्ज घेतात. यातील धोके लक्षात न आल्याने ते कर्जबाजारी होतात आणि पुढे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते.
ताणतणावावर मात करण्यासाठी योग्य आहार, सकारात्मक विचार आणि मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. योग, विपश्यना, ध्यानधारणा, आवडता खेळ किंवा छंद जोपासल्यास ताण कमी होतो. आठवड्यातून किमान एक दिवस स्वतःसाठी वेळ देणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाते तसेच मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. मित्रांशी मनमोकळा संवाद, नातेसंबंध जपणे आणि दररोज किमान आठ तासांची झोप मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या
त्याचबरोबर सोशल मीडियाचा अति वापर टाळणे गरजेचे आहे. इतरांच्या यशाची, सुखसोयीची तुलना केल्याने मनावर नकळत परिणाम होतो आणि न्यूनगंड निर्माण होतो. यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि ते अधिक चांगले कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जागरूकता आणि सकारात्मक जीवनशैली ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे एकंदरीत भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित आहे, जे विचार, भावना आणि कृतींवर परिणाम करते.
Ans: सततची काळजी किंवा भीती, नैराश्य, अपराधीपणाची भावना, झोपेत बदल (जास्त किंवा कमी), भूकेत बदल, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, सामाजिक परिस्थितीतून दूर राहणे.
Ans: अनुवांशिक घटक, मेंदूला झालेली दुखापत, बालपणीचे वाईट अनुभव.






