Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं

लहान मुलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. भारतात उपचारांचा कमी असलेला दर प्रामुख्याने उशिरा होणाऱ्या निदानामुळे आहे. पालकांनी मुलांच्या शरीरातील बदलांकडे बारीक लक्ष दिले पाहिजे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 06:52 PM
Signs of cancer in children

Signs of cancer in children

Follow Us
Follow Us:
  • भारतातही मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण
  • मुलांमध्ये सर्वात सामान्य असणारा कर्करोग
  • मुलांमधील कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे
Cancer In Children: कॅन्सर (कर्करोग) हा शब्द उच्चारला तरी मनात धडकी भरते. दुर्दैवाने, हा आजार आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरात आणि भारतातही मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी ० ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ४ लाख मुलांना कॅन्सरची लागण होत आहे.

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

भारतातील भीषण वास्तव

विकसित किंवा उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सरग्रस्त मुलांचे बरे होण्याचे प्रमाण (Survival Rate) ८०% पेक्षा जास्त आहे. मात्र, भारतासारख्या विकसनशील देशांत हेच प्रमाण ३०% पेक्षाही कमी असलेलं दिसून येतं. आजाराचं उशिरा होणारे निदान हे याचं मुख्य कारण आहे.

मुलांमध्ये सर्वात सामान्य असणारा कर्करोग (0-14 वर्षे)

  1. ल्युकेमिया(रक्त कर्करोग) – हा मुलांमध्ये असलेला सामान्य कर्करोग आहे. जो सुमारे 30 टक्के प्रकरणांमध्ये आढळतो.
  2. मेंदूतील ट्यूमर आणि पाठीच्या कण्यातील ट्यूमर – मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित गाठी असतात. हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे.
  3. लिम्फोमा – रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींवर होणारा हल्ला हा कर्करोग देखील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे.
  4. न्यूरोब्लास्टोमा आणि विल्म्स ट्यूमर – हे कर्करोग मूत्रपिंडात होतात आणि मुलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.

मुलांमधील कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे

मुलांना आपल्या वेदना नीट सांगता येत नाहीत, त्यामुळे पालकांनी खालील लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे:
सततचा ताप: औषधे घेऊनही ताप उतरत नसेल किंवा वारंवार येत असेल.
अचानक वजन घटणे: मुलाच्या आहारात बदल नसतानाही वजन झपाट्याने कमी होणे.
हाडे आणि सांधेदुखी: खेळताना दुखापत झालेली नसतानाही सतत पाय किंवा हात दुखणे.
गाठी येणे: मान, काख, पोट किंवा जांघेत दुखण्याविना गाठ येणे.
अशक्तपणा: मूल सतत सुस्त राहणे, खेळण्यात रस न दाखवणे.
रक्तस्त्राव: हिरड्यांमधून रक्त येणे किंवा त्वचेवर विनाकारण निळे डाग पडणे.
डोळ्यांमधील बदल: डोळ्यांची बाहुली पांढरी दिसणे किंवा अचानक तिरळेपणा येणे.

पालकांनो, काय कराल?

लवकर निदान हाच सर्वोत्तम उपचार आहे. जर तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतेही लक्षण २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसत असेल, तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा (Pediatric Oncologist) सल्ला घ्या. वेळेत उपचार मिळाल्यास तुमचे मूल पुन्हा खेळू-बागडू शकतं.

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

Web Title: What are the early symptoms of cancer in children how to indentify know most common cancers in kids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • cancer
  • Child Health
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मुलांना रोज चॉकलेट खाण्याची सवय? पालकांनो सावधान! आरोग्यावर असा होतो परिणाम
1

मुलांना रोज चॉकलेट खाण्याची सवय? पालकांनो सावधान! आरोग्यावर असा होतो परिणाम

Infertilty Tips: मखाना, बादाम आणि या बियांच्या मदतीने घरीच तयार करा फर्टिलिटी पावडर, मिळतीच बेस्ट रिझल्ट्स
2

Infertilty Tips: मखाना, बादाम आणि या बियांच्या मदतीने घरीच तयार करा फर्टिलिटी पावडर, मिळतीच बेस्ट रिझल्ट्स

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये… जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड ‘स्टार्टर मॅरेज’
3

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये… जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड ‘स्टार्टर मॅरेज’

६५ वर्षीय महिलेच्या निर्विकार नजरेमागे दडला दुर्मिळ आजार; डॉक्टरांनी कर्करोगाच्या दुर्मिळ पुनरागमनाचे केले निदान
4

६५ वर्षीय महिलेच्या निर्विकार नजरेमागे दडला दुर्मिळ आजार; डॉक्टरांनी कर्करोगाच्या दुर्मिळ पुनरागमनाचे केले निदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.