
सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
माईल्ड शॅम्पू
सिल्कचे कापड फार नाजूक असते ज्यामुळे यावर सामान्य डिटर्जेंट किंवा कपडे धुण्याचा साबण कधीही वापरु नये. यामुळे साड्यांचा रंग उडू शकतो आणि कापडाची काॅलिटी खराब होऊ शकते. याऐवजी सिल्कच्या साड्या धुण्यासाठी तुम्ही बेबी शॅम्पू किंवा माईल्ड शॅम्पूचा वापर करु शकता.
कॉर्नस्टार्च वापरा
जर साडीवर भाजीचे, तूपाचे किंवा बटरचे डाग लागले असतील तर त्यावर कॉर्नस्टार्च किंवा टाल्कम पावडरचा वापर करा. कॉर्नस्टार्च साड्यांवर लागलेले सर्व अतिरिक्त तेल शोषूण घेते. यासाठी डाग पडलेल्या भागावर थोडे कॉर्नस्टार्च किंवा टॅल्कम पावडर शिंपडा. ते काही मिनिटे तसेच राहू द्या. कॉर्नस्टार्च सर्व तेल शोषून घेईल. त्यानंतर, एका मऊ कापडाने पावडर काढून टाका आणि कमाल पाहा. तुम्हाला साड्यांवरील डाग फिकट झाल्याचे दिसून येईल.
व्हाईट व्हिनेगर
जर तुमच्या साडीवर चहा, काॅफी किंवा कोणते फ्रुट ज्सूस पडले असल्यास त्यावर व्हाईट व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एक कप पाण्यात एक चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळून एक द्रावण तयार करा. आता स्वच्छ कापसाच्या बोळ्याने हे द्रावण डागांवर लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. व्हाईट व्हिनेगर साडीवरील डाग फक्त दूर करणार नाही तर कापडाला मऊ ठेवण्यासही मदत करेल.