(फोटो सौजन्य: istock) (
वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायम करुन काही होत नाही, यासाठी आपल्या आहारातही काही बदल करणे महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी जर तुम्ही योग्य आहाराचे सेवन केले तर याचा तुमच्या वजनावर चांगलाच परिणाम होऊ शकते. आयुर्वेदिक डाॅक्टर उपासना वोहरा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास डाएट प्लॅन शेअर केला आहे. हा डाएट प्लॅन जर तुम्ही नियमितपणे दररोज फाॅलो केला तर याच्या मदतीने फक्त १० दिवसांत तुम्ही तुमचे ५ किलो वजन कमी करु शकता. चला या डाएट प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Kitchen Tips : न मारता स्वयंपाकघरातून मुंग्यांना कसं पळवून लावायचं? ही घरगुती ट्रिक येईल कामी
७०-८०% बेली फॅट होईल कमी
डॉ उपासना वोहरा यांनी सांगितले की, जर तुमचे वजन खूप जास्त वाढले असेल किंवा पोटाची ढेरी खूपच दिसून येत असेल तर हा १० दिवसांचा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फाॅलो करायला हवा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास तसेच पोट आणि कमरेवरील ७०-८०% अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होईल. ज्या लोकांकडे व्यायामासाठी फार वेळ नसतो ते हा डाएट फाॅलो करुन आपले अधिकाधिक वजन कमी करु शकतात.
अशाप्रकारे करा सकाळची सुरुवात
डाॅक्टरांच्या मते, झोपेतून उठताच सर्वात आधी एक ग्लास कोमट गरम पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होईल. यामुळे पचनक्रिया सक्रिय होते ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. यासोबतच यामुळे शरीरातील मेटाबाॅलिजम देखील बूस्ट होण्यास मदत होते.
सकाळचा नाश्ता कधी आणि कसा करावा?
डाॅक्टर उपासना यांच्या मते. खाण्या-पिण्याचा रुटीन सकाळी १० वाजल्यापासून सुरु करावा. सकाळच्या नाश्त्यात तुम्हाला कोणतेही फळ किंवा सीजनल फळाचे सेवन करायचे आहे. फळांसा रस पिणे टाळा कारण त्यात फक्त साखर असते. फळाचे डायरेक्ट सेवन केल्यास शरीराला फायबर आणि इतर पोषकतत्वांचा साठा मिळतो.
दुपारचे जेवण किती वाजता करावे?
या डाएट प्लॅननुसार तुम्हाला तुमचे दुपारचे जेवण अडीज किंवा तीन वाजताच्या सुमारास करायचे आहे. दुपारच्या जेवणात तुम्ही घरगुती जेवणाचा जसे की डाळ, भात, भाजी, चपाती, सॅलड यांचा समावेश करु शकता. यावेळी तुम्ही पोटभर जेवण करु शकता.
View this post on Instagram
संध्याकाळी ५ नंतर काहीही खाऊ नका
डाॅ.उपासना यांच्या मते, संध्याकाळी ५ वाजता तुम्हाला तुमचा शेवटचा आहार घ्यायचा आहे. यात तुम्ही पोहा, उपमा, इडली, सँडविच असे पदार्थ बनवून खाऊ शकता. याव्यतिरिक्त यावेळी तुम्ही घरगुती पण कमी तेलात तयार केलेल्या अन्नाचेही सेवन करु शकता. संध्याकाळी ५ वाजता तुम्ही डिनर कराल ज्यानंतर पाणी सोडून तुमच्या पोटात काहीच जाणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा १० वाजता तुम्ही सकाळचा नाश्ता कराल आणि पुढील रुटीन फाॅलो कराल. अशाप्रकारे जर तुम्ही सलग १० दिवस डाएट केलंत तर तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

