रात्रभर वाट पाहण्याची गरज नाही, फक्त 2 तासांतच घट्ट होईल; दही गोठवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन केले जाते. यातीलच सर्वांच्या आवडीचा आणि उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे दही! उन्हाळ्यात दह्याचे महत्त्व फार मोठे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान वाढते, घाम अधिक प्रमाणात येतो आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा वेळी दही हा आहारातील एक उपयुक्त आणि नैसर्गिक थंडावा देणारा पदार्थ ठरतो. दह्यामध्ये प्रॉबायोटिक्स असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच, दह्यातील पाण्याचे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते. एवढेच काय तर यामुळे त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक देखील मिळते, कारण दह्याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग यापासून बनवा कुरकुरीत पुरी; फार सोपी आहे रेसिपी
बहुतेक लोक दही बाजारातूनच खरेदी करून मग त्याचे सेवन करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? दहीला घरीदेखील अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तयार केले जाऊ शकते. विशेष म्हणजे आज आम्ही तुम्हाला जी पद्धत सांगत आहोत, त्या पद्धतीच्या मदतीने तर तुम्ही अवघ्या काही तासांतच घट्टसर दही तयार करू शकता. कंटेंट क्रिएटर नीतू यांनी ही पद्धत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. यात असा दावा केला आहे की, या युक्तीचा वापर करून दही सेट केल्यानंतर, भांडे उलटे केले तरीही त्यातून दही खाली पडणार नाही. चला तर मग काय आहे ही पद्धत ते जाणून घेऊया.
साहित्य
दही गोठवण्याची पद्धत