महागडे सनस्क्रीन वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा 'हा' गुणकारी पदार्थ
उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यासह त्वचेसुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महिला त्वचेची योग्य काळजी घेत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर गेल्यानंतर चेहरा काळा पडून जातो. याशिवाय उन्हाळ्यात शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरूम येणे, त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्येंपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम किंवा फेशिअल करून घेतले जाते. मात्र यामुळे काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळी बाहेर गेल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. सूर्य किरणांच्या थेट संपर्कात आल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊन चेहऱ्यावर वांग, काळे डाग इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनस्क्रीन लावण्याचा सल्ला सगळ्यांचं दिला जातो. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून नुकसान होत नाही. याशिवाय त्वचेची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले महागडे सनस्क्रीन लावण्यापेक्षा खोबऱ्याच्या तेलात हा पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचा अधिक सुंदर दिसेल.
बाजारात उपलब्ध असलेल्या सनस्क्रीनमध्ये हानिकारक पदार्थांचा सुद्धा वापर केला जातो. यामुळे त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या सनस्क्रीनचा वापर करावा. खोबरेल तेलात स्वयंपाक घरातील पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावल्यास चेहरा अधिक सुंदर आणि उठावदार होते.
सनस्क्रीन तयार करण्यासाठी वाटीमध्ये सर्वप्रथम, खोबऱ्याचं तेल घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण सनस्क्रीन लावण्याआधी चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसेच ठेवा. तयार करून घेतलेलं सनस्क्रीन काचेच्या बंद बाटलीमध्ये भरून ठेवा. यामुळे आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही सनस्क्रीन बाहेर किंवा ऑफिस बॅग मध्ये घेऊन जाऊ शकता. बाजारात विकत मिळणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेवर खराब झालेली गुणवत्ता सुधारावी.