हार्ट अटॅक येण्यापूर्वी काय मिळतात संकेत
आजच्या वाईट जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. हृदयविकाराचा झटका हा अशाच आजारांपैकी एक आहे. हा आजार तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ग्रासत आहे. रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यासही वेळ मिळत नाही आणि त्याचा मृत्यू होतो यावरून त्याचे गांभीर्य लक्षात येते.
मात्र, बहुतेक लोक हार्ट अटॅक येणे हा अचानक मृत्यू आहे असंच मानतात. पण असं अजिबात नाही. काही लक्षणे हृदयविकाराच्या 10 दिवस आधी दिसू लागतात. ही चिन्हे वेळीच ओळखली तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. जाणून घेऊया हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणती चिन्हे दिसतात. याबाबत अधिक माहिती दिली आहे आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी. (फोटो सौजन्य – iStock)
छातीजवळ अस्वस्थ दाब जाणवणे
मायोक्लिनिकच्या अहवालानुसार, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, तुम्हाला छातीभोवती खूप अस्वस्थ वाटते. याव्यतिरिक्त, अशा स्थितीतील रुग्णांना छातीच्या मध्यभागी छातीत दाब, सतत छातीवर दबाव येणे किंवा वेदना जाणवू शकतात. सतत छातीजवळ तुम्हाला काहीतरी होतंय असं जाणवू शकतं.
हेदेखील वाचा – तुम्ही Heart Attack च्या विळख्यातून किती वेळा वाचू शकता? लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
कामाशिवाय थकवा
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या अहवालानुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या 10 दिवस ते एक महिना आधी रुग्णांना थकवा जाणवू शकतो. नॅशनल हार्ट, ब्लड अँड लंग इन्स्टिट्यूटच्या मते, हे लक्षण विशेषतः पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दिसून येते. त्यामुळे तुम्हाला काहीही काम न करता जर सतत थकवा जाणवत असेल तर वेळीच याकडे लक्ष द्या
घाम येणे
अचानक घाम येत असल्यास
हृदयाला रक्तपुरवठा होत नसल्याने रुग्णांना खूप घाम येणे सुरू होते. बरेच लोक याला ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे असे समजण्याची चूक करतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञांची मदत घ्या. तथापि, काही लोकांना अपचन किंवा मळमळ देखील होऊ शकते. जर तुम्हाला सतत हा त्रास होत असेल तर डॉक्टरांना त्वरीत भेट द्या
हृदयाचे ठोके वाढणे
हृदयाचे ठोके अचानक वाढू लागल्यास
हृदयाला पुरेसे रक्त न मिळाल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्याच्या हृदयाचे ठोकेही वाढतात. हृदयविकाराच्या काही दिवस आधी रुग्णांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. पण कधी कधी हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला जरा जरी या गोष्टीची शंका आली तर डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
शरीरात विविध ठिकाणी वेदना होणे
हृदयविकाराच्या झटक्याच्या काही दिवस आधी आढळलेल्या लक्षणांपैकी एक म्हणजे शरीरात वेदना होणे. या स्थितीत रुग्णाला छाती, पाठ, खांदे, हात, मान आणि जबडा दुखू शकतो. वास्तविक, जेव्हा हृदयात कोणतीही समस्या असते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होते. यामुळे संपूर्ण शरीरातील वेगवेगळ्या भागात वेदना होतात.
हेदेखील वाचा – Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना
सतत चक्कर येणे
सतत चक्कर येत असल्यास लक्ष द्या
कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल तर ही बाब हलक्यात घेण्याची चूक करू नका. कारण, अशी लक्षणे हृदयविकाराची लक्षणेही असू शकतात. खरं तर, चक्कर येणे, डोकेदुखी किंवा छातीत दुखणे, श्वास लागणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे आणि रक्तदाब कमी होणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.