फोटो सौजन्य: Freepik
आधी हार्ट अटॅक हा 50 पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये आढळलेला जायचा. पण आजच्या बदल्या राहणीमानामुळे तरुण पिढी सुद्धा या आजाराला बळी पडत आहे. अशावेळी एक प्रश्न नक्कीच उद्भवतो तो म्हणजे एखादी व्यक्ती किती वेळा हार्ट अटॅकपासून वाचू शकते. या प्रश्नाचे उत्तर त्या व्यक्तीचे आरोग्य, त्याला मिळणारा उपचाराचा दर्जा आणि मदत यावर अवलंबून आहे. आज आपण हार्ट अटॅकच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरुन तुम्ही वेळीच सावध व्हाल.
हार्ट अटॅक का येतो?
आजकाल चुकीच्या लाइफस्टाइल आणि आहारांमुळे लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा आपण खूप फॅटी फूड खातो तेव्हा आपल्या रक्तात खराब कोलेस्टेरॉल वाढते. हे वाईट कोलेस्टेरॉल हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे रक्तप्रवाह थांबतो. परिणामी, रक्त हृदयापर्यंत पोहचत नाही आणि तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
हे देखील वाचा: कधीच होणार नाही हार्टमध्ये ब्लॉकेज, फक्त ‘या’ सवयींचा करा समावेश
एका व्यक्तीस किती वेळा हार्ट अटक येतो
एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किती वेळा येऊ शकतो हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे. साधारणपणे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात तीन वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या हार्ट अटॅक आल्यानंतर जर योग्य वेळी उपचार केले तर जीवनशैली सुधारू शकते, ज्यामुळे ती व्यक्ती जगू शकते. पण तिसऱ्या हार्ट अटॅकनंतर हृदय इतके कमकुवत होते की चौथ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचणे फार अवघड होऊन बसते. त्यामुळेच आपण हार्ट अटॅकची लक्षणं जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
हार्ट अटॅकची लक्षणे
हार्ट अटॅकपासून स्वतःचा बचाव कसा करावा?