
शिल्लक राहिलेला भात फेकून देत असाल तर थांबा! नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊ जाळीदार उत्तप्पा
जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. रोजच्या जेवणात कायमच भात, डाळ, भाजी, चपाती इत्यादी अनेक पदार्थ कायमच बनवले जातात. पण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातील भात शिल्लक राहिल्यानंतर एकतर तो फेकून दिला जातो किंवा कोणत्याही प्राण्यांना खायला दिला जातो. मात्र शिल्लक राहिलेला भात फेकून न देता त्यापासून तुम्ही नाष्ट्यातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात शिल्कल राहिलेल्या भातापासून जाळीदार आणि मऊ उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवसभर काम करून घरी थकून आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. अशावेळी विकतचे चटपटीत पदार्थ विकत आणून खाल्ले जातात. मात्र बाहेरील तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. उत्तपा बनवण्यासाठी पीठ आंबवावे लागते. पण कामाच्या धावपळीमध्ये तांदूळ किंवा डाळ भिजत घालण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही भातापासून पौष्टिक उत्तपा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)