(फोटो सौजन्य: istock)
कॉलेस्ट्रोल हा एक प्रकारचा फॅट आहे जो शरीर स्वतः तयार करतो आणि काही खाद्यपदार्थांमधूनही मिळतो. शरीर निरोगी राहण्यासाठी कॉलेस्ट्रोल आवश्यक असले तरी याचे प्रमाण बिघडल्यास हृदयविकारांसह अनेक समस्या उद्भवू शकतात. कॉलेस्ट्रोल दोन प्रकारचा असतो. HDL म्हणजे चांगला कॉलेस्ट्रोल आणि LDL म्हणजे वाईट कॉलेस्ट्रोल. शरीरात HDL वाढणे आणि LDL कमी होणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मात्र यासाठी जीवनशैलीत आणि आहारात बदल आवश्यक आहेत. वैस्क्युलर सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन्स स्पेशालिस्ट डॉ. सुमित कपाडिया यांनी सांगितल्याप्रमाणे काही भारतीय पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वाईट कॉलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होऊ शकते.
CML आजार म्हणजे नक्की काय? भारतीय रुग्णांना ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे हे घराघरात वापरले जाणारे औषधी गुणांनी भरलेले मसाले आहेत. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात सोल्यूबल फायबर असते. हे फायबर कॉलेस्ट्रोलला गटमध्ये बाइंड करते आणि त्यामुळे शरीर त्याचे शोषण करू शकत नाही. रात्री भिजवून ठेवलेली मेथी सकाळी खाल्ल्यास याचा चांगला फायदा होतो.
नारळ
नारळाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणेही फायदेशीर ठरते. ताजा नारळ, त्याचा तेल किंवा किस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाऊ शकतो. नारळ शरीरातील चांगला कॉलेस्ट्रोल वाढवतो. मात्र याचा अतिरेक टाळावा. भेंडी ही सुपरफूड मानली जाते कारण त्यामध्ये म्युसिलेज नावाचा घटक असतो. हा घटक कॉलेस्ट्रोलला अडकवून शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करतो. त्यामुळे नियमित भेंडीचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
सफरचंद
सफरचंदामध्ये पेक्टिन आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे लिव्हरचे कार्य सुधारते आणि शरीरातून नैसर्गिकरित्या कॉलेस्ट्रोल कमी करण्यात मदत करते. सफरचंद व्यतिरिक्त पेर आणि आवळाही यासाठी चांगला पर्याय आहे. लसूण हे कॉलेस्ट्रोल कमी करणारे सर्वात प्रभावी खाद्यपदार्थ आहे. दररोज १-२ कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्यास वाईट कॉलेस्ट्रोल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
भेंडी
भेंडी हे एक सुपरफूड आहे जे म्युसिलेजने समृद्ध आहे. म्युसिलेज कोलेस्टेरॉलला अडकवते आणि शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते. भेंडीची भाजी बनवून किंवा कुरकुरीत भेंडी तळून तुम्ही तिचा आपल्या आहारात समावेश करू शकता.
टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, केस होतील मुळांपासून स्वच्छ
लसूण
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसणाचे सेवन फार फायद्याचे ठरते. लसूण खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होतेच पण रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. तुम्ही दररोज १-२ कच्च्या लसूण पाकळ्या खाऊ शकता.
एकंदरीत, मेथी, नारळ, भेंडी, सफरचंद आणि लसूण यांसारखे साधे पण पौष्टिक पदार्थ आहारात नियमित समाविष्ट केल्यास वाईट कॉलेस्ट्रोल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. जीवनशैलीतले हे छोटे बदल दीर्घकाळ चांगले परिणाम देऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.