तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! 'या' पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे शरीरात लहान मोठे बदल दिसून येतात. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर बऱ्याचदा तोंडात जखमा होणे, अल्सर किंवा बारीक बारीक फोड येतात. हे फोड आल्यानंतर तोंडात अतिशय तीव्र वेदना होतात, ज्यामुळे अन्नपदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. याशिवाय बोलताना खूप जास्त त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे सुद्धा तोंडात अल्सर येतात. अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवल्यानंतर सुद्धा तोंडात अल्सर येण्याची शक्यता असते. विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे तोंडात जखमा होणे किंवा बारीक बारीक फोड येणे.(फोटो सौजन्य – istock)
कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, महिनाभरात दिसून येईल शरीरात बदल
तोंडात आलेले फोड किंवा अल्सर घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा काहीच फरक दिसून येत नाही. हे फोड घालवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि जीवनशैलीतील बदलांच्या परिणामामुळे तोंडात आलेले फोड कमी होतील. आज आम्ही तुम्हाला तोंडात आलेले अल्सर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे रातोरात अल्सर आणि तोंडातील जखमा दूर होतील.
शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तोंडात फोड किंवा अल्सर येतात. अशावेळी आहारात थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. दही, ताक, लस्सी किंवा इतर थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. दह्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टरीया वाढतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी दही खाल्यास पोटात वाढलेली जळजळ कमी होईल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण असे न करता रोजच्या आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. पालेभाज्या खाल्यामुळे तोंडात आलेल्या लहान लहान जखमा कमी होतात आणि तोंडात वाढलेली जळजळ कमी होते.
दैनंदिन आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. याशिवाय तोंडात आलेले फोड किंवाजखमा बऱ्या होतात. यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. पेरू, लिंबू, मोसंबी किंवा आंबट फळांचे सेवन करावे.