जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडते. कमी पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. काहींना जेवताना भरपूर पाणी पिण्याची सवय असते तर काहींना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे मंदावते. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय शरीरासाठी धोकादायक ठरते. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.वात, पित्त, कफ हे तीन दोष मानवी शरीरात आढळून येतात. त्यामुळे शरीरात कोणताही एक दोष वाढल्यानंतर शरीराचे संतुलन बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि आरोग्य सुधारेल. पाणी पिण्याचे योग्य नियम फॉलो केल्यास शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते, थकवा अशक्तपणा कमी होतो आणि आरोग्य सुधारते. लहान भागवण्यासाठी उभं राहून पाणी पिण्याची सवय अतिशय चुकीची सवय आहे. याचे चुकीचे परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर कधी पाणी प्यावे? पाणी पिण्याची योग्य पद्धत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे नियम फॉलो केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही.
ज्या व्यक्तींच्या शरीरात वात दोष असेल अशांनी जेवणानंतर उबदार पाणी प्यावे. वात थंड आणि कोरडा आल्यामुळे उबदार पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि पोट कायमच हलके वाटते. स्नायूंवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी आणि शरीराचे कार्य कायमच संतुलित राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते आणि खाल्ले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत.
अतिमसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढतो. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्याला हानी पोहचते. वारंवार ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे उबदार आणि तापमानाशी संतुलित असलेले पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेमध्ये जास्त पित्त तयार होत नाही. तसेच रक्तभिसरण सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
ज्या व्यक्तींच्या शरीरात कफ असेल अशांनी कायमच उबदार आणि मिसळलेल्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराचे कार्य सुधारते. शरीर हलके वाटू लागते. नियमित भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट स्वच्छ राहते, स्नायूंवरील तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
पाणी पिण्याचे फायदे:
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने चयापचय (metabolism) सुधारण्यास मदत होते. कोमट पाणी चयापचय वाढवते आणि चरबीच्या पेशी विरघळण्यास मदत करते.
पाणी पिण्याच्या योग्य पद्धती:
पाणी एका दमात पिण्याऐवजी हळू हळू घोटघोट प्यावे. यामुळे लाळेतील पाचक घटक पाण्यात मिसळतात आणि पचनास मदत होते. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही. जेवणाच्या मध्ये थोडे अंतर ठेवावे.
सुरक्षित पाणी कसे मिळवावे?
जर पाणी बाटलीबंद नसेल तर ते किमान एक मिनिट उकळा. ढगाळ पाणी उकळण्यापूर्वी स्वच्छ कापडाने किंवा कॉफी फिल्टरने गाळून घ्या. क्लोरीन, शिसे आणि बॅक्टेरियासारख्या दूषित घटकांना काढून टाकण्यासाठी चांगल्या प्रतीचे वॉटर फिल्टर वापरा.