फोटो सौजन्य: iStock
जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपले शरीर जास्त ऊर्जेने आणि शक्तीने भरलेले असते. पण जेव्हा आपण हळहळू वृद्ध होऊ लागतो तेव्हा कधी गुडघ्याचे दुखणे तर कधी हाडांच्या दुखण्याने त्रस्त होऊन जातो. तसेच वाढत्या वयाबरोबर आपल्याला शरीर काही महत्वाचे संकेत सुद्धा देत असते, ज्यावरून आपल्या आरोग्याचे अनुमान लावू शकतो. असेच काहीसे आपल्या फुफ्फुसासोबत सुद्धा असते.
जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2022 नुसार, भारतातील वायु प्रदूषक PM 2.5 ची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या पातळीपेक्षा दहापट जास्त आहे. जी गंभीर बाब आहे, त्यामुळे दूषित हवेचा श्वास घेतल्याने फुफ्फुसांची मोठी हानी होते. म्हणूनच शरीराकडून मिळणारे काही संकेत ओळखणे महत्वाचे आहे, जे दर्शविते की तुमचे फुफ्फुस आता कमी काम करत आहेत. श्वासोच्छवासाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, ही लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. चला या लक्षणांबद्दल अधिक जाणून घेऊया.
हे देखील वाचा: World Heart Day 2024: का साजरा होतो जागतिक हृदय दिन, महत्त्व आणि जागरूकता जाणून घ्या
श्वास घेण्यात अडचण: जर तुम्हाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तुमचे फुफ्फुस कमी क्षमतेने काम करत असल्याचे हे लक्षण असू शकते. विशेषतः जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा व्यायाम करता तेव्हा हे अधिकतर घडते. वयानुसार फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे किंवा प्रदूषणामुळेही असे होऊ शकते.
खोकला: कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्ही वारंवार खोकत असाल तर हे फुफ्फुसाच्या समस्येचे लक्षण असू शकते. हे फुफ्फुसात जळजळ किंवा सूज येण्याचे लक्षण असू शकते. जर ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली तर त्वरित डॉक्टरांना गाठा.
श्वास घेण्यात समस्या: जर तुम्हाला श्वास घेताना प्रॉब्लेम होत असेल तर ते फुफ्फुसात जळजळ होण्याचे लक्षण असू शकते. ब्रॉन्कायटिस किंवा दम्याच्या बाबतीत हे सहसा घडते. त्यामुळे अशी कोणतीही समस्या उद्भवल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
छातीत वेदना होणे: जर श्वास घेताना तुमची छाती दुखत असेल तर हे फुफ्फुसाच्या समस्येचे लक्षण असू शकते. हे लक्षण फुफ्फुसात जळजळ किंवा संसर्ग दर्शवते.
थकवा लागणे: जर तुम्हाला नॉर्मल काम केल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर ते फुफ्फुसाच्या समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा फुफ्फुस योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा ते शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत, ज्यामुळे आपल्याला थकवा येतो.