फुफ्फुसांना आतून साफ करण्यासाठी योगाचार्यांनी सांगितल्या 4 प्रभावी पद्धती; अवलंब कराल तर कधीही होणार नाही दमा-अॅलर्जीचा त्रास
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. बऱ्याचदा आजार किंवा समस्या आपल्याला बाहेरून दिसत नाहीत पण आत खोलवर शरीरात त्या पसरत असतात ज्यामुळे आपले आरोग्य खराब होऊ लागते. आपल्या निरोगी जीवनासाठी मजबूत फुफ्फुसांची आवश्यकता असते, ते ऑक्सिजन वाढविण्यास मदत करते. यामुळे मेंदू आणि इतर अवयव चांगले कार्य करू शकतात. जर तुम्हाला चालताना पटकन थकवा येत असेल, श्वास रोखला जात असेल तर हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होऊ शकते. हे तुमच्या कमकुवत फुफ्फुसांचे लक्षण आहे. कोविडनंतर, लोकांची फुफ्फुसे पूर्वीपेक्षा कमकुवत झाली आहेत.
Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण
त्यामुळेच फुफ्फुसांना बळकट आणि मजबूत बनवण्यासाठी डिटॉक्स करणे एक फायदेशीर पर्याय आहे. तुमची यात योगाची मदत घेऊ शकता. योग केल्याने आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते आणि स्नायू बळकट होण्यास मदत होते. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण आणि विषारी पदार्थ सहजपणे बाहेर काढून टाकले जातात. जर तुमचे फुफ्फुस कमकुवत असतील तर आजारांना बळी पडण्याचा धोका तुम्हाला जास्त आहे अशात रोजच्या जीवनात काही योगासने करून तुमचे फुफ्फुस निरोगी आणि मजबूत करू शकता.
फुफ्फुस स्वच्छ करण्याची पद्धत
योगाचार्य लक्ष्मी नारायण यांनी एका व्हिडिओमध्ये फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी योगासन आणि प्राणायाम बद्दल सांगितले आहे. हे फुफ्फुसांना मजबूत करण्यास, ऑक्सिजन परिसंचरण वाढविण्यास आणि शरीर लवचिक बनविण्यास मदत करतील. असे केल्याने तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि मन शांत राहण्यास सुरुवात होईल.
भुजंगासन करण्याची योग्य पद्धत
गोमुखासन करताना काय लक्षात ठेवावे?
हे करताना घाई करू नका आणि शक्य तितके करा. या आसनातून लगेच उठू नका, १-२ मिनिटे मकरासनात विश्रांती घ्या. हळूहळू त्याचा सराव वाढवा. जसे तुम्ही पहिल्या दिवशी पाच फेऱ्या केल्या, तर दुसऱ्या दिवशी आठ फेऱ्या करा आणि तिसऱ्या दिवशी १० फेऱ्या करा. अशाप्रकारे हळूहळू शरीरावर ताण द्या आणि ते वाढवत रहा. लक्षात ठेवा, श्वास वरपर्यंत रोखून ठेवायचा आहे आणि मग श्वास हळूहळू सोडून द्यायचा आहे.
गोमुखासन करण्याची योग्य पद्धत
अनुलोम विलोम प्राणायाम
Weight Loss पासून इम्युनिटी वाढवेपर्यंत अंजीर ठरते ‘रामबाण’, आरोग्यासाठी फायदे
कपालभाती प्राणायाम
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.