पोटात वारंवार वेदना किंवा गॅस होत असेल चुकूनही करू नका दुर्लक्ष! शरीरात वाढू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय अपुऱ्या झोपेचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. पोटात दुखणे, पाठीमध्ये दुखणे, गॅस, अपचन इत्यादी समस्या सगळ्यांचं उद्भवतात. पण नेहमीच पोटाच्या समस्या वाढू लागल्यानंतर गंभीर आजार होऊ शकतात. अनेक लोक अपचनाच्या समस्यांना ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. बऱ्याचदा पोटासंबंधित वाढलेल्या समस्यांमुळे डायबिटीस किंवा थायरॉइड होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायबिटीस किंवा थायरॉइड होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरामध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटातील स्नायूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते. ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊन सतत पोट बिघडणे किंवा पोटात वेदना होतात. वारंवार तुम्हाला तर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेह आणि थायरॉइडची तपासणी करून घ्यावी.
गॅस-अॅसिडिटी होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. हल्ली प्रत्येक व्यक्ती गॅस-अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहे. वारंवार तुम्हाला जर गॅस-अॅसिडिटी होत असलेल्या थायरॉईड तपासणी करून घ्यावी. त्यामुळे वेळीच तपासणी करून योग्य ते उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर सुद्धा पोटाच्या समस्या उद्भवतात.
आपल्यातील अनेकांना अतिशय हलक्या किंवा सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा मळमळ वाटू लागते. ही सामान्य समस्या नसून आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे संकेत आहेत. सतत मळमळ किंवा उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.
थायरॉईडचे विकार म्हणजे काय?
थायरॉईडचे विकार म्हणजे थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित होत नाही. यामध्ये थायरॉईडचे अति-सक्रिय (hyperthyroidism) किंवा अल्प-सक्रिय (hypothyroidism) असणे समाविष्ट आहे.
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे काय आहेत?
अचानक वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, हातापायांना कंप सुटणे, जास्त घाम येणे, आणि चिडचिड यांचा समावेश होतो.
थायरॉईड विकारांवर उपचार काय आहेत?
हायपोथायरॉईडीझमसाठी थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (thyroid hormone replacement therapy) दिली जाते, तर हायपरथायरॉईडीझमसाठी औषधे, रेडिओएक्टिव्ह आयोडीन थेरपी (radioactive iodine therapy), किंवा शस्त्रक्रिया केली जाते.