Cancer च्या पेशी होतील कायमच्या नष्ट! 'हे' उपाय केल्यास आयुष्यात कधीच होणार नाही कॅन्सर
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण शरीराला झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. कॅन्सर केवळ अनुवंशिक दोषांमुळेच नाही तर चुकीच्या जीवनशैलीमुळे सुध्दा होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, आहारात खाल्ले पदार्थ, कोणत्या पदार्थ नियमित प्यायले जातात इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅन्सर होऊ नये, कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढणार नाहीत.(फोटो सौजन्य – istock)
अप्लायतील अनेकांना सतत गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण दैनंदिन आहारात सतत गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होते. याशिवाय रक्तात वाढलेली साखर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवते. त्यामुळे आहारात कमी कमी गोड पदार्थ खावेत. गोड पदार्थ खाण्याऐवजी आहारात पालेभाज्या, फळे किंवा सुका मेवा खावा. आहारात इन्सुलिनची पातळी संतुलित असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते.
रोजच्या आहारात कायमच शरीराला सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच सहज पचन होणारे पदार्थ खावेत. अवोकाडो, सुकामेवा, बिया, पालेभाज्या, ऑलिव्ह तेल इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कॅन्सरच्या अतिनियंत्रित पेशी वाढू नये म्हणून पोषक आहार घेणे आवश्यक आहे.
वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवणे अतिशय महत्वाचे आहे. कारण शरीरात वाढलेल्या लठ्ठपणामुळे आरोग्यासंबंधित इतरही गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग हा अतिशय उत्तम पर्याय आहे. इंटरमिटेंट फास्टिंग करताना १२ ते रात्री ८ या वेळेमध्ये अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय नेहमीच हलकासा व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, हलका व्यायाम, योग, स्ट्रेचिंग इत्यादी अनेक गोष्टी केल्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो.
कर्करोग म्हणजे काय?
कर्करोग म्हणजे शरीरातील पेशी abnormally वाढायला लागतात आणि असामान्य पेशींचे समूह (tumor) तयार करतात. या पेशी शरीरात पसरु शकतात आणि इतर अवयवांनाही नुकसान पोहोचवू शकतात.
कर्करोग होण्याची कारणे काय आहेत?
कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात, जसे की अनुवंशिकता, काही specific विषाणू, धूम्रपान, अति मद्यपान, हानिकारक रसायनांचा संपर्क, आणि काही environmental घटक.
कर्करोग प्रतिबंध करता येतो का?
काही प्रमाणात कर्करोग प्रतिबंध करता येतो. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, आणि sun protection यांचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.