
मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकल्यास असे करा कॅचअप लसीकरण
पालकांनो तुम्हाला तुमच्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे अवघड जातेय का? तुम्हाला माहिती आहे का, एखादे लसीकरण चुकल्यास मुलं गंभीर संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात आणि त्यांच्या एकुण आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो. मात्र आता काळजी करू करण्याचे कारण नाही आपण कॅच-अप लसीकरण म्हणजेच चुकलेले एखादे लसीकरण पूर्ण करून मुलांना आवश्यक ते संरक्षण पुरविणे. यामुळे केवळ मुलांचे आरोग्य सुरक्षित राहत नाही तर रोगराई पसरण्यासही आळा बसतो.याबद्दल डॉ. अमर भिसे, सल्लागार – पीआयसीयू (बाल अतिदक्षता विभाग), नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
STI Problem: 40% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त, लाजेमुळे उपचारास विलंब; तज्ज्ञांचा खुलासा
तज्ज्ञांच्या मते, मुलांचे आरोग्य आणि दर्जेदार जीवनमान राखण्यासाठी कॅच-अप लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे पालकांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून यासंदर्भातील सर्व शंका दूर कराव्यात आणि विलंब न करता मुलांचे लसीकरण करून घ्यावे.लसीकरण हे मुलांना गंभीर आजारांपासून वाचविण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरत आहे. आजारपण, प्रवास किंवा जागरूकतेचा अभाव अशा विविध कारणांमुळे बऱ्याच मुलांचे लसीकरण चुकते. अशा वेळी कॅच-अप लसीकरणाने ही उणीव भरून काढता येते.नवजात बाळ , शाळकरी मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक मानले जाते. पालकांनी वेळीच लसीकरण करून मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
या वयोगटातील लसीकरण शालेय प्रवेशासाठी तसेच मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या लसींमुळे शाळा व तसेच सामाजिक ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखता येतो.कॅच-अप लसीकरण हे बालआरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.