
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो
टोमॅटोचे फायदे?
चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी उपाय?
त्वचा उजळदार करण्यासाठी घरगुती उपाय?
वातावरणातील बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा खूप जास्त टॅन होणे, बारीक मुरूम, वांग, काळे डाग इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या उद्भवून चेहरा अतिशय निस्तेज दिसू लागतो. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे काहीकाळ त्वचा खूप जास्त सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालातंराने पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या वाढू लागतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. पण सतत स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. आंबटगोड टोमॅटोचा वापर जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. टोमॅटोमध्ये विटामिन सी, ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. टोमॅटोचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचा अधिक चमकदार दिसेल. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डेड स्किन आणि टॅन घालवण्यासाठी टोमॅटोचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. टोमॅटोच्या वापरामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि चमकदार दिसेल. यामुळे काळे डाग आणि बारीक बारीक मुरूम कमी होतात.
चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. अँटिऑक्सिडंट्स घटकांमुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, लाल चट्टे कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे त्वचेतील हायड्रेशन कायम टिकून राहते. यामध्ये असलेले लायकोपीन घटक त्वचेवर वाढलेला डलनेस कमी करून नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी मदत करते. बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटोचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात दही, मध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा अधिक सुंदर होईल. १५ ते २० मिनिट झाल्यानंतर काहीवेळा हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक आठवडाभर नेहमीच लावल्यास त्वचा सॉफ्ट, फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच टोमॅटोचा वापर करावा.