Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

फिरण्याची आवड आहे पण बजेटमुळे ट्रिप रद्द होते का? पुनीत जिंदल यांच्या ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’मुळे कमी पैशांत देश-विदेश फिरणं शक्य आहे. Google Flights वापरून स्वस्त फ्लाइट पकडा आणि निघा!

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 08:18 AM
नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नववर्षी कुटुंबासोबत छान ट्रिप प्लॅन करा
  • बजेट कमी, पण टेन्शन घेऊ नका
  • कमी पैशात करा इंटरनॅशनल ट्रिप
जर तुम्हालाही फिरण्याची प्रचंड आवड असेल, सतत कुठेतरी ट्रिपला जायचं मन होत असेल, पण बजेट पाहताच प्लॅन रद्द होत असेल, तर आता काळजी करू नका. बिझनेस कन्सल्टंट पुनीत जिंदल यांनी स्वस्तात फिरण्यासाठी एक भन्नाट आयडिया शेअर केली आहे. त्यांच्या @zorbathezenn या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्यांनी फिरण्याचा एक वेगळाच आणि किफायतशीर फॉर्म्युला सांगितला आहे. त्यांच्या मते, “नो प्लान इज अ गुड प्लान” म्हणजेच जास्त प्लॅनिंग केल्याने प्रवास महाग होतो, तर कोणताही ठराविक प्लॅन न करता निघालात तर प्रवास स्वस्त आणि अधिक मजेदार ठरतो. चला तर जाणून घेऊया हा स्वस्त ट्रॅव्हल जुगाड नेमका आहे तरी काय.

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

पुनीत जिंदल यांचा ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’

पुनीत जिंदल सांगतात की ते कधीही आधी ठरवून एखाद्या शहराची किंवा देशाची तिकीट बुकिंग करत नाहीत. ते थेट Google Flights उघडतात आणि त्या क्षणी जिथे सर्वात स्वस्त फ्लाइट मिळते, तिथेच जाण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या मते, “स्वस्त फ्लाइट दिसली की लगेच निघा. प्लॅन कराल तर प्रवास हमखास महाग होतो.”

फक्त 14,000 रुपयांत इंटरनॅशनल ट्रिप

पुनीत यांनी सांगितलेला एक अनुभव खूपच रंजक आहे. एकदा त्यांना काश्मीरची ये-जा तिकीट फक्त 4,500 रुपयांत मिळाली आणि त्यांनी लगेच ट्रिप केली. दुसऱ्या वेळी पुण्याची फ्लाइट 16,000 रुपयांची होती, पण त्याच वेळी कझाकस्तानमधील अल्माटीची राउंड ट्रिप फक्त 14,000 रुपयांत मिळाली. मग काय, त्यांनी थेट इंटरनॅशनल ट्रिपच केली. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी फक्त 600-700 रुपयांत हॉस्टल घेतलं, ज्यात जेवणाचाही समावेश होता.

स्वस्तात काश्मीर, बाली आणि बँकॉक

पुनीत यांना एकदा 6,500 ते 7,000 रुपयांत व्हिएतनामची फ्लाइट मिळाली आणि ते लगेच रवाना झाले. व्हिएतनाममध्ये असतानाच त्यांनी पुन्हा Google Flights वापरलं आणि बालीसाठी फक्त 7,000 रुपयांची फ्लाइट मिळाली. भारतातून बालीला जाण्यासाठी साधारणपणे 30-35 हजार रुपये खर्च येतो, पण त्यांनी हा प्रवास अवघ्या 7,000 रुपयांत केला. आणखी एकदा ते घरी बसून मित्रासोबत सहज सर्च करत होते, तेव्हा अचानक 8,000 रुपयांची बँकॉक फ्लाइट दिसली आणि त्यांनी लगेच बॅग भरून प्रवासाला सुरुवात केली.

पुनीत जिंदल यांचा ट्रॅव्हल मंत्र

पुनीत जिंदल म्हणतात की प्रवासासाठी कोणाची वाट पाहू नका. सोलो म्हणजेच एकट्याने प्रवास करा. त्यांच्या मते, एकट्याने फिरताना इतकी नवीन माणसं भेटतात, इतके अनुभव मिळतात की ते कोणत्याही डिग्री किंवा डिप्लोमापेक्षा जास्त शिकवण देतात.

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

स्वस्तात ट्रिप करायची असेल तर काय करावे?

  • Google Flights वर जाऊन Explore ऑप्शनवर क्लिक करा, तिथे वेगवेगळ्या ठिकाणांचे स्वस्त फ्लाइट रेट दिसतील.
  • आधीच ठराविक प्लॅन करू नका, जिथे फ्लाइट स्वस्त असेल ती जागा निवडा.
  • महागड्या हॉटेलऐवजी हॉस्टल बुक करा, ते खूप किफायतशीर असतात.
  • सोलो ट्रॅव्हलची भीती बाजूला ठेवा आणि प्रवासादरम्यानच प्लॅनिंग करा.
  • देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय – जिथेही स्वस्त फ्लाइट मिळेल, तिथे फिरायला निघा.
  • योग्य वेळ साधली, तर कमी पैशांतही जग फिरता येतं, हे पुनीत जिंदल यांचा ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’ नक्कीच सिद्ध करतो.

Web Title: In the new year visit bali for rs 7000 and bangkok for just rs 8000 know what is the cheapest way to travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Trip

संबंधित बातम्या

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
1

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
2

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 
3

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

Mumbai Chor Bajar : मुंबईचा चोर बाजार माहितीये का? स्वस्तात मिळतात इथे महागातील महाग वस्तू
4

Mumbai Chor Bajar : मुंबईचा चोर बाजार माहितीये का? स्वस्तात मिळतात इथे महागातील महाग वस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.